pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सत्यशोधक विद्यालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

0 4 1 5 0 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 6

मानव विकास व पुर्ननिर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचलित, सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोषेगाव येथे आज दिनांक 06 डिसेंबर 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी प्रकाश आपल्या भाषणातून टाकला विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांचा हा दिवस शोक करण्याचा नसून तर त्यांचे विचार अमलात आणून समजतील शोषित व गरजू लोकांना मदत करावी हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली असेल असे विद्यार्थ्यांनी आपले मत मांडले. या नंतर हिंदी विषयाचे मार्गदर्शक डॉ.श्री.विलास उंबरे यांनी मार्गदर्शन अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज ही पदवी मिळाली म्हणजे प्रखर ज्ञान बाबासाहेब साहेबांकडे होते. ते नसले तरी त्यांचे विचार चिरकाल जगाला योग्य दिशा दाखवत आहे असे मत त्यांनी मांडले त्या नंतर त्यांनी हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे व त्याचा आपल्याला स्पर्धा परीक्षे मध्ये कसा उपयोग होईल व कसे ह्या विषयी पूर्ण ज्ञान व बोलणे आपण शिकू तेव्हा आपण सहज स्पर्धा परीक्षेमध्ये आपण यश संपादित करू शकतो असे मत त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मत मांडले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्री. फुके यांनी केले. ह्या वेळी कार्यक्रमाचे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अध्यक्ष विशाल खोडके याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.पांढरे यांनी परिश्रम घेतले तसेच हिंदी विषयाचे प्रा. हिवरे हे ही उपस्थित होते.आभार प्रदर्शन आदित्य जैवळ याने केले.कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य श्री.सुनीलजी वाकेकर तसेच संस्थेच्या सचिव श्रीमती जयश्रीताई बनकर यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 5 0 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे