मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुक मार्गात बदल
जालना/प्रतिनिधी,दि. 26
मराठवाडयातील काही मराठा समाज दिनांक 26 ऑगस्ट, 2025 रोजी पासुन अंतरवाली सराटी या ठिकाणी जमणार आहे. त्यामुळे दिनांक 26 ऑगस्ट, 2025 रोजी मराठवाडयातील जालना जिल्हा वगळता इतर जिल्ह्यातील सुमारे 10 ते 12 हजार लोक अंतरवाली सराटी याठिकाणी जमणार असून, सदर आंदोलन यात्रा दिनांक 27 ऑगस्ट, 2025 रोजी 10.00 वा. मौजे अंतरवाली सराटी ते मुंबई येथे जाणार आहे.
या यात्रेसाठी अंतरवाली सराटी येथे दिनांक 27 ऑगस्ट, 2025 रोजी 40 ते 50 हजार मराठा आंदोलक जमण्याची शक्यता असल्याने सुमारे 10 ते 12 हजार लोक आंदोलन यात्रेत सर्व सामानासह यात्रा सुरु करणार आहे. उरलेली लोक त्यांना बळेगावपर्यंत सोडण्यास येणार आहे.
त्याअनुषंगाने सदर ठिकाणी मोठ्याप्रमाणात जनसमुदाय हजर राहणार आहे. सदर आंदोलन यात्रेच्या वेळी अडथळा निर्माण होवु नये, रस्ता मोकळा राहावा तसेच रस्त्यावर वाहणे उभी राहुन मार्गात अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये. या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधिक्षक, अजय कुमार बंसल, जालना यांना प्रदान केलेल्या शक्ती नुसार जालना शहरातील वाहतुक नमुद पर्यायी मार्गाने वाहतुकीचे नियमनासाठी या मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात (Diversion) आले आहे.
सध्याचा प्रचलित मार्ग पैठण फाटा शहागड ते पैठण दिनांक 27 ऑगस्ट, 2025 रोजी मराठा आंदोलन यात्रेच्या अनुषंगाने वाहतुक नियमन बाबत पर्यायी मार्ग बीड गेवराईकडून येणारी पैठण फाटा शहागड मार्गे पैठणकडे जाणारी वाहने ही शहागड पाचोड एनएच 52 या महामार्गाने एकेरी वाहतुक जाण्यासाठी-येण्यासाठी राहणार आहे. वरील आदेश दिनांक 27 ऑगस्ट, 2025 रोजी 9.00 वाजेपासून मराठा आंदोलन यात्रा संपेपर्यत अंमलात राहणा असल्याचे पोलीस अधिक्षक कार्यालय, जालना यांनी कळविले आहे.
