pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कलम 144 लागू

0 4 1 5 0 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.11

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दि. 18 जुलै ते 8 ऑगस्ट 2023 या कालावधीत आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि.18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे कामी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 लागु करण्यात आले आहे. असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी जारी केले आहेत.
दहावी व बारावी परिक्षांच्या कालावधीत परिक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये या करिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांनी जालना जिल्हयात निश्चित केलेल्या परिक्षा केंद्र परिसरातील 100 मीटर हद्दीत परिक्षा चालु असतांना काही पालक, परिक्षा न देणारे विद्यार्थी उपद्रव करीत असतात. परिक्षार्थ्यांना नकला पुरविणे व परिक्षा केंद्राच्या परिसरात घुटमळत राहणे त्यांच्या या कृतीमुळे परिक्षा केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परीक्षा केंद्राजवळच्या 100 मीटरच्या परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन/एसटीडी बुथ/फॅक्स/झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावे. फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करुन वरील केंद्राच्या 100 मीटर परिसरात याद्वारे प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहे. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे दृष्टीने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 (2) नूसार हा आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे. आदेशाची प्रसिध्दी पोलीस अधिक्षक, जालना यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे करावी. हा आदेश परिक्षा कालावधीत सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 5 0 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे