pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्रीसंत,श्रीगुरू अस्तित्वाची जाणीव करून देतात

0 4 1 5 1 0
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.13

ह.भ.प .नारायण महाराज पिंपळे
टेंभुर्णी प्रतिनिधी
श्रीसंत आणि श्रीगुरु आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. असे प्रतिपादन ह. भ. प. नारायण पिंपळे यांनी टेंभुर्णी येथील सिद्धिविनायक गणपती संस्थान टेंभुर्णी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये केले.
मागील 26 वर्षापासून सिद्धिविनायक गणपती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह श्री संत ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा व श्री संत रंगनाथ बाबा पुण्यतिथी निमित्ताने आयोजित केला जातो.
याही वर्षी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा सप्ताह सुरू आहे. या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये तिसऱ्या दिवशीचे कीर्तन पुष्प ह.भ .प. नारायण महाराज पिंपळे यांच्याकडे सेवा होती.
त्यावेळी महाराजांनी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या!!न करी रे संग, राही रे निश्चळ !! लागो निधी मळ ममतेचा!!* अभंगावर निरूपण केले.
यावेळी महाराज म्हणाले मानवाच्या अस्तित्वाची जाणीव श्री गुरु व श्री संत महात्मे करून देतात. जर श्री संतांच्या वचनावर मानवाने चालण्याचा प्रयत्न केला तर निश्चित मानवाचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही. कुणाचा संग करावा, कुणाचा करू नये .आणि संग केल्याच्या नंतर काय प्राप्ती होते, असे तुकोबारायांनी या अभंगातून सांगितले तेच चिंतन महाराजांनी यावेळी केले.
मानवाने इंद्रयावर विजय मिळवला पाहिजे. वासनेचा क्षय केला पाहिजे काम क्रोधावर विजय मिळवला पाहिजे. तरच मानवाच्या जीवनामध्ये ब्रह्मभाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. व जीवनामध्ये आनंदी आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. असे श्री संत तुकोबाराय म्हणतात.
या अखंड सप्ताहाचे नियोजन व आयोजन श्री खलसे गुरुजी व टेंभुर्णी पंचक्रोशीतील मंडळी करतात. किर्तन सेवेकरिता उपस्थित ह.भ.प. राजू महाराज जैवाळ, ह.भ.प. संतोष महाराज चव्हाण, गणपत भिताडे गुरुजी,सिद्धेश्वर लंगोटे गुरुजी, विनायक खलसे, विष्णू पिंपळे महाराज,टेंभुर्णी येथील भजनी मंडळी तसेच अकोला देव येथील भजनी मंडळी व काळेगाव येथील भजनी मंडळी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 5 1 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे