pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रियदर्शनी कॉलनी येथे संकटमोचन हनुमान मंदिरात अन्नकूट प्रसाद सोहळा संपन्न

0 4 1 5 1 0
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.5

जालना शहरातील प्रभाग क्र. १ मधील प्रियदर्शन कॉलनी येथे असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिरात मागील ३५ वर्षांपासून चालत आलेली अन्नकूट प्रसादाची परंपरा यंदाही भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या स्वयंप्रेरणेने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही अन्नकूट प्रसाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी उपस्थित राहून महाआरती केली आणि भक्तांसोबत प्रसादाचा लाभ घेतला.

भास्कर आबा दानवे बोलताना म्हणाले की, “प्रियदर्शनी कॉलनीतील संकटमोचन हनुमान मंदिरात गेली अनेक वर्षे भक्तिभावाने अन्नकूट प्रसादाची परंपरा जपली जाते. ही परंपरा ही केवळ धार्मिक नाही तर सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. अशी संस्कारमूल्ये पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.

त्यांनी यावेळी आयोजक मंडळाचे कौतुक करत ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत कायम ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, कल्याण भदनेकर, प्रभागातील दिलीप शर्मा, अजित मानधनी, कैलास अग्रवाल, पालवे सर, शिवम यादव, किशोर आगलावे यांसह महिलांमध्ये शारदा काबरा, कमल मंत्री, मंगला मानेगावकर, मीना मित्तल, शोभा अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

अन्नकूट प्रसादासाठी परिसरातील नागरिक, महिला, युवक, बालक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. संपूर्ण परिसरात “जय हनुमान” च्या घोषणांनी धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 5 1 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे