pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज करावेत

0 4 1 5 1 0
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.30

अल्पसंख्यांक विकास विभाग, शासन निर्णयान्वये मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिन्दी, मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयांचे शिक्षण देणे, मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इ. 9 वी, 10 वी, 11 वी व 12 वीतील तसेच औद्योगिक शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती देणे, परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होऊन त्यांची रोजगार क्षमता वाढून आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल या दृष्टीने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देणे यादृष्टीने डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यास शासन मंजूरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विकास विभाग यांचे परिपत्रकान्वये सन 2025-26 या वर्षासाठी सदर योजना राबविण्यात येणार असल्याने पात्र मदरशांची शिफारस करण्याचे निर्देश दिले आहे. शासन निर्णयातील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या मदरशांनी अर्जासोबत शासन निर्णयांमध्ये नमूद कागदपत्राच्या साक्षांकित प्रती जोडून परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना या कार्यालयात दाखल करण्याचा अंतिम दि. 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे, याची नोंद घ्यावी. विहीत मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. सदर योजनेच्या शासन निर्णयासोबतच्या अर्जाचा नमुना (https://jalna.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 5 1 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे