तोष्णीवाल महाविद्यालयात युवती सक्षमीकरण

हिंगोली/प्रतिनिधी, दि.28
सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयात दिनांक 27- 8 -2019 मंगळवार रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत महाविद्यालयीन युवतींसाठी युवती सक्षमीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ श्रीपाद तळणीकर तर प्रमुख वक्त्या म्हणून मराठी विभागात कार्यरत असलेल्या डॉ अंजली टापरे व प्राध्यापिका ए पी देशमुख कार्यक्रमात उपस्थित होत्या. कार्यक्रमाधिकारी डॉ राजाभाऊ नववणकर, प्रा. ज्ञानेश्वर तडस, डॉ. जी पी भालेराव आदी मंडळी उपस्थित होती डॉ अंजली टापरे यांनी युवती सबलीकरणाच्या अनुषंगाने स्व -जागृकता या विषयाची योग्य फोड करत युवतींनी आपल्या रोजच्या जीवनात स्व जागृत राहणे गरजेचे आहे युवतींना शिक्षण घेत असताना आपल्या आत्मसन्मानाला कुठेच इजा पोहोचणार नाही याविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे. संभाषण करत असताना कुठेच आत्मप्रौढी व लीनता नसावी जेणेकरून संकटाला सामोरे जावे लागेल. मैत्री करत असताना प्रलोभन पासून कोसो दूर राहणे गरजेचे की ज्यामुळे अल्पकालीन इच्छांमध्ये गुंतण्याची इच्छा होतांना आपण दीर्घकालीन उद्दिष्टांना तीरांजली देत असतो याची पुरेशी जाणीव काळजी घ्या अशी भावना व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्यांनी भारतीय संविधानाचा दाखला देत स्त्री पुरुष समानता समान अधिकार याची अभ्यासपूर्ण मांडणी करत आपल्या अधिकाराप्रती मुली जागृत राहणे ही काळाची गरज आहे., त्या अनुषंगाने सजग राहावे हा मूलमंत्र त्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ आर् व्ही नवगणकर सूत्रसंचालन प्रा संजय फड तर आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर तडस यांनी केले. कार्यक्रमास युवतींची संख्या मोठ्या प्रमाणात होती.