उमेद कंत्राटी कर्मचा-यांची अडचणी सोडवण्याची मागणी

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.20
महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन राबवित असलेल्या उमेद अभियानात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभीयान ग्रामविकास व पंचायत राज विभागा अंतर्गत असलेल्या विविध योजनेत उमेद अभियानाचे महत्वपूर्ण योगदान ठरले आहेत. उमेद महारष्ट्र राज्य महिला आणि कत्रांटी कर्मचारी कल्याण कारी संघटनेकडुन आस्थापनेला मान्यता देणे कार्यरत कत्रांटी अधिकारी कर्मचारीवर्गासह समुदाय संसाधन व्यक्तीला सेवेत कायम स्वरूपी करणे , तालुक्याच्या ठिकाणी गरजेनुसार सभागृह उपलब्ध करून देणे या सह आपल्या काही प्रलंबित मागणीकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सतत पाठपुरावा सुरु असून नुकतेच संपन्न झालेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील उमेद अभियानातील अधिकारी कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर हदगांव तालुका उमेद अभियानाच्या वतीने खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह आमदार माधवराव पाटील जवळगावकर व शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांना आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी तालुका व्यवस्थापक तथा संघटना जिल्हा सचीव गंगाधर राऊत , उपाध्यक्ष अमोल नवसागरे , शेख समुह साधन व्यक्ती कमलबाई कावळे सविता निमडगे पळसेकर , सवीता चव्हाण दुर्गाताई भारती वनीता शिंदे धानोरा यांच्यासह तालुक्यातील समुदाय संसाधन व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.