pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

   “मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना” बँक खाते आधार सिडींग करण्याचे आवाहन

0 4 1 5 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.13

जालना जिल्ह्यातील “मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण” योजनेकरीता अर्ज केलेल्या सर्व लाभार्थीना जाहिर आवाहन करण्यात येते की, आपण अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सिडेड (Adhar Seeding) आहे की नाही, याची खात्री करुन घ्यावी. बँक खात्याला आधार सिडींग केलेले नसल्यास तात्काळ आपले खाते ज्या बँकेत आहे अशा बँकेत जाऊन आधार सिडींग करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

डिबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी सदरची बाब अनिवार्य आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत आहे. 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज केला तरी सर्व पात्र लाभार्थीना जुलै -2024 पासून दरमहा 1500/- रुपये लाभ मिळणार आहे.

1 जुलै ते 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थीना 17 ऑगस्ट रोजी थेट डिबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्यांचा लाभ जमा होणार आहे. 1 ऑगस्ट ते 31ऑगस्ट दरम्यान प्राप्त अर्जाची छाननी होऊन सप्टेंबर 2024 अखेर पर्यंत पात्र लाभार्थीना योजनेचा लाभ देण्यात येईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 5 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे