ब्रेकिंग
प.पू .विश्वनाथबाबा पुण्यस्मरणा निमित्य कार्यक्रम संपन्न

0
3
1
8
4
6
पुणे/आत्माराम ढेकळे,दि.23
येथील गंगाधाम परिसरात ॐसाई-विश्वनाथ दरबार येथे प.पू.सद्गुरु श्री.विश्वनाथबाबा यांच्या ५ व्या पुण्यस्मरणा निमित्य दि.१३/१०/२०२४ रोजी सकाळी अभिषेक,भजन, सकाळची आरती धुपआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विविध ठिकाणाहुन भाविकभक्त आले होते.त्यांनी विश्वनाथबाबाच्या मुर्तीचे व प.पू.श्री संतनाथबाबा यांच्या पादुकाचे मनोभावे दर्शन घेतले.याप्रसंगी गुरुमाऊलीआईमाता श्रीमती नीताजी रांका यांनी सर्व भाविकांना मनोभावे आशिर्वाद दिले.भजन कार्यक्रमात प्रामुख्याने एल.के.गुप्ता शिवसहायसिंह बनारसवाले,जयप्रकाशजी गुप्ता आदींचा सहभाग होता.शेवटी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
0
3
1
8
4
6