लघु आळंदी नावाने ओळखल्या जाणाऱ्या श्री सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती येथे गुरुपौर्णिमा निमित्त गुरुमंत्र (गुरुउपदेश)धार्मिकार्यक्रमाचे आयोजन
नांदेड/चंपतराव डाकोरे पाटील,दि.20
मुखेड पासूनच जवळच असलेल्या महाराष्ट्रामध्ये लघु आळंदी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या श्री सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती तालुका मुखेड येथे गुरुपौर्णिमा निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र सहित चार राज्यांमध्ये प्रसिद्ध असलेले जागृत मठ संस्थान श्री श्री सद्गुरु नराशाम महाराज लघु आळंदी नावाने ओळखल्या जाणाऱ्या येवती तालुका मुखेड येथे चार राज्यांमध्ये शिष्यगण असलेले देवस्थान गुरुपौर्णिमेनिमित्त व वर्षभरामध्ये अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अनेक भाविक भक्त या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा निमित्त गुरु शिष्य या गुरुमंत्र गुरुचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविक मठ संस्थांमध्ये सहभागी होत असतात तसेच याच दिवशी गुरु मंत्र गुरुउपदेश देऊन अनेक शिष्य गण यामध्ये सहभागी होत असतात आलेल्या सर्व शिष्यांना दुपारी दोन वाजता महाप्रसाद घेऊन आणि गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी या धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्री सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवतीच्या वतीने करण्यात येत आहे
