pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल, मोहपुरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

विविध योग मुद्राचे विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वी आयोजन

0 4 1 3 8 4
[sp_wpcarousel id="1375"]

अंबड/प्रतिनिधी,दि.21

शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधीत आपली गुणवत्ता सिद्ध करणारी मोहपूरी येथील त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाने साजरा करण्यात आला.
प्राचार्य डोंगरे बिआर यांच्या मार्गदर्शनानुसार सहशिक्षिका कन्हारे के.एस यांनी योगाचे महत्त्व व आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यामागची भूमिका विशद करत अमूल्य मार्गदर्शन केले तर सांस्कृतिक विभाग प्रमुख भालेकर ए.व्ही यांनी सूर्यनमस्कार व योगाच्या विविध मुद्राचे प्रात्यक्षिक सादर केले.
सुमधुर गीतावर सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे व जोशपूर्ण वातावरणात योगाचे सामूहिक प्रात्यक्षिक सादर करत योग विद्या आत्मसात केली. आपल्या रोजच्या दिनचर्येतही योग रोज करण्याचा निर्धार याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे नमूद केला.
विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाने अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय योग दिवस यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डोंगरे बि.आर यांच्या मार्गदर्शनानुसार, खरात के.आर, नाटकर व्ही.एल, सातपुते एस यु , शिंदे एम.आर, डोंगरे आर.पी, जुनेद काजी, राखुंडे, सहशिक्षिका कन्हारे, सातपुते जे.एस, गिरी के.एन, विजयमाला भालेकर, सातपुते एस.डी, साबळे,खरात,निकम यांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमूल्य योगदान दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 8 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे