आसेगाव येथे एक तास गावाच्या स्वच्छतेसाठी गावकऱ्यांनी श्रमदानातून दिला स्वच्छतेचा मंत्र

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.1
आज आसेगाव येथे सकाळी 10 ते 11 यादरम्यान ग्रामपंचायत आसेगाव तालुका गंगापूर अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज मैदान शॉपिंग सेंटर अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा आशा विविध ठिकाणी देशांचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान कचरा मुक्त भारत एक दिवस एक तास अभियान राबविण्यात आले याप्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर शिवनाथ मालकर ग्राम विकास अधिकारी कटारे आप्पा सरपंच पदी दिपक राजगुरू ग्रामपंचायत सदस्य कृष्ण खिल्लारे नारायण कांबळे परमेश्वर जाधव जनार्दन पल्हाळ संदीप जाधव शालेय कमिटी अध्यक्ष मधुकर जाधव पोलीस पाटील बाळू कांबळे धनेधर सर गवळी सर इंगळे सर जाधव मॅडम खोचरे मॅडम निर्मलाताई पल्हाळ ताई शेळके ताई जाधव मावशी किरण कांबळे किशोर जाधव नारायण आडुळे तुकाराम जाधव मच्छिंद्र काळे इत्यादीची उपस्थिती होती