अशोकराव जाधव पाटील यांची पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल मित्रमंडळी कडुन त्यांचा सत्कार

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटील,दि.14
नांदेड शहरातील म्हाडा कॉलनी नविन कौठा नांदेड येथील रहिवासी मा.अशोकराव जाधव पाटील हे सर्वांचे मनमिळाऊ स्वभाव,व पोलिस खात्यात नौकरीला असुन सर्व व्यसनापासून अलिप्त तर आहेतच पण ते धार्मिक,वृत्तीचे असल्यामुळे ते दरवर्षी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व जागृत हनुमान मंदिर म्हाडा कॉलनी नविन कौठा नांदेड येथे अखंड हरिनाम सप्ताहात व्हावे म्हणून मित्रपरिवार व कॉलनीतील व परीसरातील भाविक भक्ताच्या सहकार्यासोबत सात दिवसांचा सप्ताह अनेक धार्मिक कार्यात सहभागी होत असल्यामुळे ईश्वर कृपेने त्यांना पोलिस उपनिरीक्षक पदि पदोन्नती झाल्याबद्दल म्हाडा कॉलनी नविन कौठा नांदेड येथे अनेक मित्रपरिवार व कॉलनीतील नागरिक त्यांचा सत्कार करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देत आहेत.
आज झालेल्या सत्कार प्रसंगी हभप तुकाराम महाराज पांचाळ, हभप गणपतराव वडजे पाटील, हरीभाऊ वराळे पाटिल, प्रकाशराव बोरोळे पाटिल,चंपतराव डाकोरे पाटिल,अनिल मेडेवार, किसनराव राठोड,माधव पवार, शिवाजी घोरबांड,हंबर्डे पाटील इत्यादी कार्यकर्त्यांनी मा. अशोकराव जाधव पाटिल
यांची पोलिस उपनिरीक्षक पदि पदोन्नती झाल्याबद्दल मित्रमंडळी कडुन त्यांचा सत्कार करुन पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.