pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांग व्यक्तींनी अर्ज सादर करावेत

0 4 1 3 8 5
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 22

हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान  योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी करण्यासाठी पोर्टल दि. 3 डिसेंबर 2023 रोजी  तयार करण्यात आले आहे. तरी दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविणेसाठी https://evehicleform.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असून लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दि. 4 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक १०.०६.२०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांच्या स्तरावरुन सुरु आहे. योजनेचा उद्देश –  दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे,  दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.  सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे असा आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 8 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे