
0
3
1
8
7
7


जालना/प्रतिनिधी,दि.29
जालना शहरातील वाढविलेला मालमत्ता कर रद्द करून, पुर्वीप्रमाणे कर करा, या मागणीसाठी 28 ऑगस्टपासून शहरातील शौला चौकात सामाजिक कार्यकर्ते मयुर मोहनलाल अग्रवाल व गणेश उत्तमराव लुटे यांनी उपोषण केले.
दरम्यान उपोषणाच्या पहिल्याच दिवशी सदरील उपोषणस्थळी खासदार कल्याण काळे, भाजपाचे नेते राऊत राऊत, अशोकअण्णा पांगारकर, उमेश अग्रवाल, संजय देठे, व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष सतीश पंच, सुभाषचंद्र देविदान, पिपल्स बँकेचे चेअरमन संजय मुथा, व्हा. चेअरमन संजय भरतीया, रवि अग्रवाल, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष विजय वाडेकर, विश्वनाथ क्षिरसागर, नारायण खुळे, मच्छींद्र दळवी , पांडुरंग मिसाळ, सखाराम मिसाळ, प्रकाश राऊत, कैलास पिंपळे, गोविंद श्रीमाळी, आशिष टोकशा, निलेश अग्रवाल यांच्यासह अनेकांनी भेटीगाठी दिल्या. दरम्यान, जालना शहर महापालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त श्रीमती नंदा गायकवाड यांनी लेखी आश्वासन दिले. व महापालिकेतर्फे वाढविलेला कर बाबत शहरातील नागरिकांना एक वेळेची संधी देण्यात येईल व त्यासाठी एक अपील ठेवण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच सदरील व्यवस्थापन करण्याकरीता एक महिन्याचा कालावधी मागितला आहे. महापालिकेच्या लेखी आश्वासनानंतर दोन्ही उभयंत्यांनी तुर्त उपोषण मागे घेतले आहे.
जालना शहरात यापुर्वी कालेब्रो कंपनीने केलेल्या सर्व्हेनंतर जालनेकरांचा मालमत्ता कर वाढवला आहे. त्यानंतर महापालिकेने वाढलेला कर वसूलीसाठी तगादा सुरू केला. वाढलेला मालमत्ता कर रद्द करून, पुर्वीप्रमाणे कर आकारावा या मागणीसाठी मयुर अग्रवाल व गणेश लुटे यांनी उपोषण केले. दरम्यान सायंकाळी 7 वाजता महानगरपालिकेच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
या उपोषणास विनोद यादव, सुभाष क्षिरसागर, सुनिल चौधरी राजेश नरवैय्ये, धन्नु काबलिये, मेघराज चौधरी, विष्णु पाचफुले, विजय चौधरी, दिपक भुरेवाल, सुनिल काळे, .शुभम गायकवाड, ज्ञानेश्वर सोनवणे, गणेश खराटे, महेश कोळेश्वर , भोलेश्वर मित्रमंडळ कन्हैयानगर , जय महाकाल सोशल ग्रुप यांच्यासह शहरातील नागरिकांनी भेटी दिल्या.
यावेळी महापालिकेचे कार्यालयीन प्रमुख विजय फुलंब्रीकर महाराज, केशव कानपुडे, कर अधिक्षक शोऐब कुरेशी यांनी भेटी दिल्या.
———————————————–
लेखी आश्वासन पाळावे, अन्यथा पुन्हा उपोषण
मयुुर अग्रवाल व गणेश लुटे यांची माहिती
जालना शहर महापालिका प्रशासनाने लोकभावना लक्षात घेवून आम्हाला लेखी आश्वासन दिले. एका महिन्याच्या आत महापालिकेने नागरिकांचा वाढलेला कर नियमाने कमी करावा, नागरिकांच्या करासंदर्भातील समस्या दुर कराव्यात नसता, पुन्हा उपोषण करण्याची वेळ येवू देऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मयुर अग्रवाल व गणेश लुटे यांनी केली आहे. जालना महापालिकेत कर विभागाने बेकायदेशीर कमी-जास्त टॅक्स केला असून, त्याची चौकशी करण्याची मागणीही उभयत्यांनी केली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
3
1
8
7
7