pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक सतीश जाधव यांच्या नेतृत्वात जाफ्राबाद पोलिसांची मोठी कारवाई….

निमखेडा परिसरात अवैध वाळू उपसा करणारे पाच टिप्पर जप्त

0 4 1 3 8 9
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.11

जाफ्राबाद पोलिस निरीक्षक सतीश जाधव यांच्या नेतृत्वात जाफ्राबाद पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई करत निमखेडा बुद्रुक परिसरातील पूर्णा नदीच्या काठावर सुरू असलेला अवैध वाळू उपसा उधळून लावला. या कारवाईत अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे पाच टिप्पर पोलिसांनी जप्त केले असून त्यांची एकूण किंमत अंदाजे रु. ०१ कोटी ५० लाख इतकी असल्याचे प्राथमिक गणनेतून स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारवाई दिनांक ०९ डिसेंबर रोजी पहाटे साधारण ३ वाजता पोलिसांना माहिती मिळाली की काही व्यक्ती टिप्परच्या सहाय्याने अवैधरीत्या वाळू उपसा करत आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक एस. एस. जाधव यांच्या नेतृत्वाखाली टीमने तात्काळ निमखेडा शिवारात धाड टाकली.

कारवाईदरम्यान खालील अशोक लीलैंड कंपनीचे टिप्पर घटनास्थळावर आढळून आले व ताब्यात घेण्यात आले त्यामध्ये
एम.एच २८ बीबी ४०४१, एम. एच १९ सीवाय ३६५०, एम. एच २७ बीएक्स ३६३२
एम. एच २८ बी डब्ल्यू ८८९० एम एच २१ बी एच ३२४१,

प्रत्येक वाहनाची अंदाजित किंमत साधारण रु. ३० लाख रुपये असून सर्व वाहनांची एकत्रित किंमत रु.१.५ कोटी इतकी आहे.

जप्त केलेले सर्व टिप्पर जाफ्राबाद पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले असून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अयुष नोपानी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.तसेच तहसीलदार डॉ. सारिका भगत, पोलीस निरीक्षक सतिश जाधव, सपोनि महादेव चव्हाण, पोउपनि वासुदेव पवार तसेच पोलीस व महसूल पथक या संपूर्ण कारवाईत सहभागी झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 8 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे