प्रतिभा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी निवडला लोकशाही मार्गाने वर्गप्रतिनिधी!
वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांनी अनुभवली मतदान प्रणाली
बदनापूर/प्रतिनिधी, दि 26
बदनापूर तालुक्यातील प्रतिभा माध्यमिक विद्यालय, काजळा या शाळेने (pratibha Madhyamik Vidyalaya) लोकशाही पद्धतीने मतदान (Voting) घेत वर्ग प्रतिनिधी व उपवर्गप्रतिनिधी निवडले. विद्यालयाने मागील 2 वर्षांपासून लोकशाही (Democracy) पध्दतीने प्रतिनिधी निवडीची परंपरा कायम ठेवली आहे. शाळा प्रतिनिधी मुले या गटातून रामेश्वर मांगडे तर मुलींमधून मुलींमधून कु.वैष्णवीं गरड यांनी प्रतिनिधींनी विजय संपादन केला.
असा असतो संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
लोकशाही पद्धतीने निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमानुसार जशी लोकसभा-विधानसभा निवडणूक होते. तशीच ‘EVM Simulator app’ वर प्रतिभा माध्यमिक विद्यालायची निवडणूक प्रक्रिया शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत गुजर, वर्ग 10 वी चे वर्गशिक्षक भगवान धनगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवतात. वर्ग प्रतिनिधी निवडताना निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची यादी शाळेतील प्रथम दर्शनी फलकावर लावण्यात येते. निवडणूक अर्ज दाखल करण्यापासून ते माघार घेण्याचा कालावधी देखील नमूद करीत शेवटी दोन दिवस त्या उमेदवारांस प्रचाराला देखील वेळ दिला जातो. 20 जून ते 24 जूनपर्यंत या सर्व प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी भगवान धनगे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर शिक्षक पारदर्शकपणे राबविण्यास सहकार्य करतात.
सर्व विद्यार्थ्यासमोर मतमोजणीची प्रक्रिया (Voting)
(ता.24 ) मतदान प्रक्रिया होऊन सर्व विद्यार्थ्यासमोर मतमोजणीची प्रक्रिया सर्व शिक्षक पूर्ण करीत उमेदवारांना पडलेल्या मतानुसार निकाल जाहीर केला.
(EVM Simulator app वर मतदान करताना शाळेची विद्यार्थ्यांनी)
शाळा प्रतिनिधी मुले या गटातून रामेश्वर मांगडे तर मुलींमधून कु.वैष्णवीं गरड यांनी वर्ग प्रतिनिधीं म्हणून विजय संपादन केला. निवडून आलेल्या उमेदवारांने आपल्या वर्गाची शिस्त, विविध उपक्रमात जास्तीतजास्त सहभाग घेत त्याची गुणवत्ता सिद्ध करणे यासह प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्याच वर्गाचा डंका राहील यासाठी प्रयत्न करण्यात महत्वाची भूमिका निभावतात. मागील 2 वर्षांपासून प्रतिभा माध्यमिक विद्यालय या शाळेत वर्ग प्रतिनिधी लोकशाही मतदान पद्धतीने निवडण्याची परंपरा आहे. यंदा देखील सदरची निवडणूक निर्भीड वातावरणात पार पडली.
16 जून रोजी वर्ग प्रतिनिधीची निवडणुकीची घोषणा करण्यात आली. 17 ते 19 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे. 20 तारखेला प्राप्त उमेदवारी अर्जाची छाननी होत वैध उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. 21 ला अर्ज माघारी घेण्याचा दिनांक होता. तर 22 ते 23 जूनपर्यंत प्रचार करण्याची मुदत देण्यात आली. 24 ला प्रत्यक्ष मतदान होत दुपारी 2 वाजता सर्व विद्यार्थ्यांसमोर मतमोजणी प्रक्रिया पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भगवान धनगे यांनी दिली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत गुजर,सहशिक्षक सुनील पाटील,दत्तात्रय मुळे, दगडू पठाण,लक्ष्मण कुऱ्हाडे,मिलिंद उनवणे,प्रवीण गावडे,योगेश टेके शिक्षकेत्तर कर्मचारी दीपक परजने, प्रभाकर कोळेकर, अरुणा शेरे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्याने हजर होते.
(मतदान करून घेण्यासाठी ओळख पाठवताना व बोटाला शाही लावण्यासाठी परजने सर व कुऱ्हाडे सर)
