वृक्षदिंडीने डुकरी पिंपरी गाव दुमदुमले…

जालना/प्रतिनिधी, दि.13
जालना तालुक्यातील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना.
वृक्षदिंडीने डुकरी पिंपरी गांव दुमदुमले…. या शाळेत शालेय विद्यार्थ्यांंनी लेजीम व पावली,पारंपारीक ड्रेस परिधान करून डोक्यावर तुळस ,तसेच वृक्ष तोड थांबवा असा सुध्दा संदेश विद्यार्थांनी दिला तसेच अनेक प्रकारातील वृक्षांची रोपे घेऊन गावातुन घोषणा देत वृक्ष दिंडी काढली व त्यांचे महत्व साधत बालगोपाळांची दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.शाळेच्या प्रवेशद्वारापासून संपुर्ण गावात दिंडी काढत झाडे लावा,झाडे जगवा हा संदेश दिला पर्यावरणाचे संतुलन रागण्यासाठी वृक्ष लागवडी बरोबरच त्यांचे संवर्धन करण्याची जाणिव समाजात निर्मांन व्हावी यासाठी राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना शाळेच्या कार्यक्रमांतर्गत वृक्षदिंडी काढून डुकरी पिंपरी गावातील परिसर दणाणुन सोडला.मुलांच्या हातात पर्यावरणाचा संदेश देणारे फलक होते.’भारत माता की जय,वंदे मातरम्’झाडे लावा-झाडे जगवा,’एक मुल -एक झाड,झाडे वाचवा,कागद वाचवा,वृक्ष एक लाभ अनेक आदी घोषणा ते देत होते जागृत कांळुकामाता मंदिर परिसर आदि मार्गांवरून घोषणा देत ही दिंडी निघाली. वृक्षदिंडीचे आकर्षणवृक्षदिंडीतील सहभागी विद्यार्थीं ग्रामीण भागातील शेतकरी च्या वेशभूषेत व फेटे बांधून आणि मुली साड्या नेसून सहभागी झाल्या होत्या.दिंडी बघण्यासाठी ठिकठिकाणी वाहनचालक,नागरिक,महिला यांची गर्दी होती.विद्यार्थांनी दिलेल्या गगनभेदि घोषणा व शिस्तबद्धतेचे नागरिकांनी व महिलांनी कौतुक केले रिमझिम पाऊस सूरू झाला .विद्यार्थांनी त्यांत भिजण्याचा आनंद लुटत ढोल-ताशांच्या साथीने सुरेख नृत्य सादर केले.त्यांना उपस्थितांनीही दाद दिल्यामुळे विद्यार्थी मनसोक्तपणे पावसात भिजत होते यावेळी राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना. शाळेचे मुख्याध्यापक पर्यावरण रक्षण व वृक्षारोपणाचे महत्व शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे.सी.जी.यांनी विद्यार्थांना सांगितले.औद्योगिक क्षेञातून विशारी वायु हवेत मिसळत असल्यामुळे व घातक सांडपाणी उघड्यावर सोडत जात असल्यामुळे प्रदुषणाचा धोका वाढला असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे.सी.जी. यांनी सांगितले त्यांनी प्रत्येकांने एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
वाचवाल तर वाचाल …
‘पर्यावरण रक्षण ही सगळ्यांचीच जबाबदारी असून त्यासाठी आपल्या रोजच्या सवयींमध्ये फक्त थोडा बदल करणं आवश्यक आहे’, असं मत तरुणाईनं मांडलं. तसंच पर्यावरण वाचवाल तर मानव जात वाचेल, असाही संदेश यावेळी देण्यात आला.
पर्यावरण हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे विविध प्रकारची संकटं येत असून, पृथ्वीची वाटचाल विनाशाकडे सुरू झालीय की काय अशी चर्चा होतेय. दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप अशा एकामागोमाग एक नैसर्गिक आपत्ती येतायत. तरुणाईही त्यावर उत्स्फूर्तपणे व्यक्त झाली. ‘पर्यावरण रक्षण ही सगळ्यांचीच जबाबदारी असून त्यासाठी आपल्या रोजच्या सवयींमध्ये फक्त थोडा बदल करणं आवश्यक आहे’, असं मत तरुणाईनं मांडलं. तसंच पर्यावरण वाचवाल तर मानव जात वाचेल, असाही संदेश यावेळी देण्यात आला.पर्यावरण रक्षण हेच कर्तव्य सध्या पर्यावरण या विषयाला खूप महत्त्व आलंय. त्याचं कारण ही तसंच आहे. पाऊस नाही, उन्हाळा वाढलाय. पण याला कारणीभूत कोण तर आपणच. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत आपण पर्यावरण हा विषय शिकत आलो. पण हा विषय फक्त पुस्तका पुरता मर्यादित न ठेवता, त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून करायला हवी. रस्त्यात कचरा टाकू नये, झाडे लावावीत त्यांना पाणी घालावं. मला ही सगळी शिकवण घरातून मिळाली. मी ३-४ वर्षाचा असताना समोरच्या मैदानात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करायचो. पण नुसती झाडं लावून होत नाही त्याची निगा राखावी लागते. आमच्या घरातील प्रत्येकजण रोज त्या झाडांना पाणी घालायचा. आज २० वर्षांनी ती झाडं एवढी मोठी झालीत की, त्यांचा उपयोग सगळ्यांनाच होतोय. असंच जर प्रत्येकाने स्वत:पासून सुरवात केली तर पर्यावरणाचा हा गंभीर प्रश्न सुटेल. असा शाळेचे सहशिक्षक मदन.वाय.बी.यांनी म्हटले यावेळी उपस्थित गावतील महिला मंडळी यांनी जोरदार स्वागत केले घरासमोर रांगोळी सडा सारवन गुलाबाचे पुष्पवृष्टी करून दिंडीचे पालखीचे स्वागत केले.यावेळी उपस्थित गावचे सरपंच ,उपसंरपच,ग्रामपंचायत सद्स ,शाळेचे व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष ,उपअध्यक्ष व्यवस्थापन समिती चे सर्व पदअधिकारी,पञकार,वार्ताहार,तरूण मिञमंडळी,कष्टकरी शेत मंजुर माता भगणी,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,क्षेञातील मंडळी,आजी माजी विद्यार्थी ,भजंनी मंडळी ,तसेच गावातील सरपंच व उपसरपंच व सर्व आजी माजी ग्रामपंचायत सद्स व शाळा व्यव्यस्थापन समिती यांनी ह्या दिंडी साठी खुप सहकार्य व योग्य असे नियोजन केले सर्व वारकरी विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी यांचे फराळ पाणी यांची व्यवस्था करण्यात आली ग्रामस्थं व शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद यांनी मेहनत घेतली. श्रीमती.कुलकर्णी.एस.आर.,मदन.वाय.बी.,सोनकांबळे.डी.एन.,नागरे.पी.पी.,श्रीमती.देशपांडे.ए.बी,जाधव.एल.बी.,ठाकरे.आर.एस.,राऊत.एस.,बी.,खरात.एम.,ए.व गावतील ग्रामस्थं उपस्थित होते…