pub-7425537887339079
Breaking
महाराष्ट्र

विकासाची परंपरा कायम ठेवून मतदार संघातील ९९ टक्के गावांचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला – आ. आशुतोष काळे

0 1 1 8 3 4

आपेगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या व शिरसगाव येथे रस्ता भूमिपूजन व ओपन जिमच्या लोकार्पण प्रसंगी आ. आशुतोष काळे समवेत मान्यवर.

विकासाची परंपरा कायम ठेवून मतदार संघातील ९९ टक्के गावांचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला – आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव मतदार संघातील जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून विकासाची परंपरा कायम ठेवूनतीन वर्षात ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांसाठी ७० गावांना तब्बल २६० कोटी निधी आणून मतदार संघाच्या ९९ टक्के गावांचा अत्यंत जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव-वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील आपेगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत ९६.५८ लाखाच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच शिरसगाव येथे ९.२० लक्ष रुपये निधीतून श्री. मारुती मंदिर ते जिल्हा परिषद शाळा रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन व ओपन जिम साहित्याचे लोकार्पण आ. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, विकासाचे राजकारण करण्याची काळे परिवाराची परंपरा आहे. त्यामुळे निधी देतांना नेहमी राजकारण बाजूला ठेवून माझ्या मतदार संघातील जनतेचे विकासाचे प्रश्न मार्गी लावायचे हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजवर केलेल्या प्रामाणिक पाठपुराव्यातून मतदार संघातील ९९ टक्के गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला आहे. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात आपेगावला पिण्याचे पाण्यासाठी १.२५ लाखाचे पाईप दिले आहे. काळे परिवाराची हि परंपरा पुढे चालवतांना पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत परावलंबी असलेल्या आपेगावचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी ९६.५८ लाखाचा निधी दिला आहे. तीन वर्षात आजवर मतदार संघातील ९९ टक्के गावांचा पाणी प्रश्न कायमचा सुटला असून उर्वरित गावांचा पाणी प्रश्न देखील लवकरच सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.यावेळी कारभारी आगवन, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, पं. स. माजी सभापती अर्जुनराव काळे, सरपंच अशोक उकिरडे, उपसरपंच इरफान पटेल, सांडूभाई पठाण, बाबासाहेब शिंदे, एकनाथ शिंदे, नानासाहेब निकम, रवींद्र निकम, बबनराव गाडे, गणेश दाणे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण चौधरी, राहुल गायकवाड, पोपटराव भुजाडे, रामभाऊ खिलारी, साईनाथ गव्हाळे, राजेंद्र भुजाडे, प्रभाकर खिलारी, वाल्मीक आहेर, दीपक गव्हाळे, हरिभाऊ खिलारी, रवींद्र खिलारी, रविंद्र भुजाडे, काशिनाथ वाकचौरे, रामभाऊ आहेर, योगेश खिलारी, शरद खिलारी, सलीम पटेल, किरण भागवत, सुलतान पटेल, सलीम शहा, बशीर शहा, गणेश गायकवाड, फारूक शेख, मतीन सय्यद, जुबेर शहा, गंगाधर गायकवाड, शाहरुख पटेल, भगवान बोजगे, आसिफ पटेल, अमोल संचेती, आसिफ इनामदार, सुदाम माने, वजीर शेख, शहाजीन पटेल, अबरार पटेल, अन्सार पटेल, विकी चांदर, अखिलेश भाकरे, गणेश कानडे, शैलेश रांधवणे, नितीन चौधरी, मन्सूर पटेल, शकील पटेल, संदीप भागवत, आसिफ पटेल, गणपत उकिरडे, अमोल सोळसे, खलील पटेल, आकृत गायकवाड, सार्थक गायकवाड, आतिफ पटेल, रियान पटेल, अशपाक पठाण, सद्दाम पटेल, विजय त्रिभुवन, पंचायत समिती अभियंता गणेश गुंजाळ, कॉन्ट्रॅक्टर अशोक आव्हाटे, ग्रामसेवक चंदन गोसावी आप्पासाहेब गव्हाळे, दिनकर भुजाडे, सुभाष गव्हाळे दादासाहेब भुजाडे, विलास भुजाडे, देविदास भुजाडे, प्रभाकर भुजाडे, भागिनाथ लोहकरे, सुभाष भुजाडे, रावसाहेब खिलारी, कल्याण गव्हाळे, शुक्लेश्वर भुजाडे, गणेश भुजाडे, राजेंद्र भुजाडे, भानुदास श्रीरंग आहेर, अखिलेश भाकरे, गणेश कानडे, दशरथ लोहकरे, शैलेश रांधवणे, कैलास पाटोळे, सार्वजनिक बांधकाम अभियंता गणेश गुंजाळ, कॉन्ट्रॅक्टर दीपक देशमुख, ग्रामसेवक संजय काटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4