pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सह्याद्रीरत्न शिवव्याख्याते धिरेंद्र ठाकूर यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार २०२६ प्रदान.

0 4 1 2 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.5

पाणदिवे,तालुका उरणचे रहवाशी सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सह्याद्रीरत्न धिरेंद्र ठाकूर यांना ह्या वर्षीचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ॲड. महेश मधुकर ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अलिबाग येथ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या राज्यभरातील गुणीजनांचा आमदार भाई जगताप,आमदार जयंत पाटील,प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर यांच्या उपस्थितीत शिवव्याख्याते धिरेंद्र ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले.शिवव्याख्याते म्हणून गेले कित्येक वर्ष शिवविचारांचा जागर विविध कॉलेज शाळा मंडळे तालुके जिल्ह्यात ते करत आहेत. कधीही गड न पाहिलेल्या शेकडो श्रोत्यांनी त्यांच्या व्याख्यानाने प्रेरित होऊन रायगडाचे दर्शन घेतले. हे त्यांच्या व्याख्यानाचं विशेष मानलं जातं.शिवजयंतीच्या दिवशी सलग चार-पाच व्याख्यान देण्याचे भूषणावह काम ते करत आहेत.सदर कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या उपस्थितांचे समोर शिवविचारांचा जागर घालण्यासाठी आयोजकांनी धिरेंद्र ठाकूर यांचे व्याख्यान आयोजित केले .त्यामध्ये त्यांनी त्यांच्या येऊ घातलेल्या शिवचिंतन पुस्तकातील शिवछत्रपती एक नव्हे चार साम्राज्ये, सोळावं वर्ष शिवछत्रपती आणि आम्ही,इतिहासातील दुसरी पावनखिंड,शिवछत्रपती सर्वश्रेष्ठ राजा या विषयावरील त्यांच व्याख्यान उपस्थितांच्या अंगावर शहारे आणि नवीन इतिहास जागृत करणारे होते.सन्मानाची शाल प्रशस्तीपत्रक आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 2 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे