pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून जेष्ठ नागरिक आणि महिलांच्या अधिकाराविषयी मार्गदर्शन शिबीर संपन्न

0 4 1 1 5 0
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 3 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना तर्फे दि. 30 सप्टेंबर 2023 रोजी नारायणी फाउंडेशन, जालना येथे जेष्ठ नागरिक आणि महिलांचे अधिकार या विषयावर मागदर्शन शिबीराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती प्रणिता भारसाकडे- वाघ आणि अॅड. महेशन धन्नावत हे उपस्थित होते.
श्रीमती प्रणिता भारसाकडे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी जीवनात कसे पुढे गेले पाहिजे आपले ध्येय कसे निवडले पाहिजे आणि ध्येयापासुन विचलित करणाऱ्या गोष्टीपासुन स्वतःला कसे दुर ठेवले पाहिजे तसेच आपल्या जीवनामध्ये शिस्त लावली पाहिजे आणि शेवटी जिद्दीने मेहनत केल्याशिवाय आपल्या जीवनाला काही अर्थ नाही, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस अॅड. महेश एस. धन्नावत यांनी जेष्ठ नागरिकांचे अधिकाराविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत चिंचखेडकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 1 5 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे