pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आजी माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांसाठी 10 ऑगस्टला महसूलसंबंधी कामांसाठी उपक्रम

0 4 1 2 3 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.5

महसूल पंधरवाडा निमित्त जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिक व अवलंबितांसाठी शनिवार, दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता सर्व तालुक्यांमध्ये आजी माजी सैनिकांसाठी “सैनिक हो तुमच्यासाठी”  उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या दिवशी तहसीलदार व महसूल कर्मचारी आजी माजी सैनिकांच्या महसूल संबंधित कामे करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये पुढील प्रमाणे महसूल कामांचा समावेश असेल. शेतीच्या रस्त्यासंबंधी, घरकुल, इ) निवृत्ती वेतन नसलेल्यासाठी संजय गांधी निराधार योजना,  निवृत्ती वेतन नसलेल्यासाठी श्रावण बाळ निराधार योजना, प्रलंबित फेरफार नोंदी, महसूल संबंधी इतर तक्रारी, शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन, राशन कार्ड, 7/12 इत्यादी संदर्भातील कामे.

वरील उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त आजी माजी सैनिकांनी व त्यांच्या अवलंबितांनी सर्व कागदपत्रांसह संबंधित तहसील कार्यालयात दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन मेजर (डॉ) निलेश प्रकाश पाटील (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 2 3 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे