pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र शाखा हुस्सा ता. नायगाव बोर्डाचे अनावरण व तालुक्यातील अनेक शाखा कार्यकारिणी निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन

0 4 1 2 6 8
[sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.16

नायगाव तालुक्यातील हुस्सा ता. नायगाव येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र बोर्डाचे अनावरण व तालुक्यातील अनेक शाखा कार्यकारिणीची निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा दि.24डिसे.2023 रोजी सकाळी 11.00 वाजता
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य ह.भ. प. श्री राम महाराज पांगरेकर यांच्या शुभहस्ते नामफलकाचे अनावरण व नायगाव तालुक्यातील सर्व आघाडीतील कार्यकारणी व शाखा कार्यकारणी पदाधिकारी याना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, श्रीरामजी पाटील शिंदे व्यंकटराव पाटील कपाटे श्री दत्तराम पाटील एडके सल्लागार श्री शिवाजी पांगरेकर,श्री बालाजी पा.जाधव, उपाध्यक्ष गंगाधर हंबर्डे,सचिव -व्यंकटराव जाधव सहसचिव प्रभाकर पा. पुयड कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड संस्थेचे सदस्य श्री प्रवीण रौतुलवाड,श्री गुलाबराव पा.उबाळे,श्री हरिनाम पा.कदम,श्री संतोष पा.कदम,श्री भगवान पा.रहाटीकर ,श्री त्रिमुख पा.येडके, जिल्हाप्रसिध्दिप्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येणार असल्याची माहिती संयोजक मंडळी यांच्याकडून कळविण्यात आली आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील व तालुक्यातील शाखेतील सर्व आघाडी मुख्य आघाडी, प्रसिद्धी आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी,साधुसंत,भाविक भक्त मंडळी उपस्थिती राहुन आपल्या जीवनात अमुलाग्र व संतांच्या सानिध्यात वावरण्यासाठी संत संग हाच खरा मार्ग आहे आणि जीवनामध्ये धार्मिक कार्य करण्यासाठी ज्ञानभक्ती आणि जीवन सुखकर करण्यासाठी भक्तिमार्ग फार महत्त्वाचाआहे म्हणून अशा महान प्रसंगी आपली उपस्थिती असणे ही गरज असुन संस्थापक अध्यक्ष ह भ प पुज्य गुरूवर्य श्री राम महाराज पांगरेकर यांच्या रसाळ ज्ञान अमृतांचे गोडवे घेण्याकरिता नांदेड जिल्ह्यातील धार्मिक वातावरण शुध्दीकरण करण्यासाठी गाव तिथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेची नांदेड जिल्ह्यातील पहिली शाखा बोर्डाचे अनावरण करण्यासाठी या संतसंग मेळाव्यात सर्व सदभक्तानी उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे नायगाव तालुका अध्यक्ष सोपान पाटील गिरे ता.सचिव बालासाहेब यरबडे,कोषाध्यक्ष राजाराम गादेवार,अशोक वाघमारे जिल्हा प्रसिद्धी उपप्रमुख व हुस्सा येथील शाखा अध्यक्ष श्री महादेवराव तुकाराम वाघमारे, प्रकाश वाघमारे, शंकर वाघमारे,किशोर वाघमारे सूर्यकांत वाघमारे यांनी केले आहे.
असे पत्रक जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 2 6 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे