जिल्हाधिकारी कार्यालयात संगणक शिकता शिकता कमवा
योजनेतंर्गत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण

जालना/प्रतिनिधी,दि.28
छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत “सर सेनापती वीर पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा योजना” सुरू केली आहे. या योजने अंतर्गत संगणक ज्ञानाच्या माध्यमातून जनतेची सहभागी विद्यार्थ्यांना विविध कामे करणे यामध्ये आधार कार्ड काढणे, पॅन कार्ड काढणे आदि उपक्रम राबविण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार आणि निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 28 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज सारथी – डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एन्हांसमेंट प्रोग्रामअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहर यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कार्य महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या केंद्रामार्फत करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांनी “वीर बाजी पासलकर – संगणक शिकता शिकता कमवा” या संकल्पनेअंतर्गत त्यांना मिळालेल्या संगणक कौशल्याचा वापर करून मिळविलेल्या आपल्या पहिल्या कमाईतून आई-वडिलांसाठी भेटवस्तू घेतली. या विद्यार्थ्यांचे कौतुक म्हणून शुक्रवार, दि. 28 जून रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ व निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांचा हस्ते सत्कार करुन प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अमर देवडे यांची उपस्थिती होती. यावेळी जालना विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा तसेच त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या केंद्र चालकांचाही सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या अश्विनी नरवडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी केंद्र चालक तसेच महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अजमत शेख, कृष्णा मिसाळ उपस्थित होते.