नायगाव चे नुतन महिला तहसीलदार मंजुषा भगत यांचा दिव्यांग,वृध्द,निराधार,मित्र मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न

जिल्हा प्रतिनिधी/चंपतराव डाकोरे पाटील,दि.30
नायगाव तहसील कार्यालयातील कर्तव्य दक्ष नुतन महिला तहसीलदार पदि तहसील कार्यालयाचा पदभार मा.मंजुषा भगत यांनी स्विकारला तेंव्हा त्यांचा सत्कार नायगाव तहसील कार्यालयात दिव्यांग,वृध्द, निराधार,मित्र मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी नायगाव तालुक्यातील दिव्यांग,वृध्द, निराधारांच्या विषयावर चर्चा करुन दिव्यांग कायदा २०१६ च्या कायद्याची अंमलबजावणी नसल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवावर तालुक्यांत अन्याय होऊ नयेत आपण पोलिस खात्यातुन आल्यामुळे कायद्याची माहिती असल्यामुळे आपल्या कडुन दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी करून न्याय द्यावा अशा अनेक विषयी चर्चा करण्यात आली.
यावेळी दिव्यांग,वृध्द,निराधार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार मॅडम यांनी दिले आहे.यावेळी दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष चंपतराव पा.डाकोरे, कुंचेलीकर, जिल्हासंपर्कप्रमुख तथा पत्रकार नागोराव पा.बंडे आलुवडगावकर, गंगाधर कदम,बाबाराव ढगे,गणेश कदम,मारोती शिंदे,भिमराव कोंडवाड,साईनाथ पांढरे,तानाजी ईगोंले ईत्यादी उपस्थित होते.