pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

लायन्स क्लब पनवेल आणि जन कल्याण सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन

एक दिवसीय शिबिरात ६४ व्यक्ती मोतीबिंदू शस्त्र क्रियेसाठी पात्र होण्याची पहिलीच वेळ

0 4 1 2 3 8
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27

ग्राम पंचायत वेश्वी,तालुका उरण येथे जन कल्याण सामाजिक संस्था व लायन्स क्लब पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन प्रा. राजेंद्र मढवी उपाध्यक्ष उरण सामाजिक संस्था व सुनील तांबोळी सरपंच वेश्वि ग्राम पंचायत यांच्या हस्ते करण्यात आले. सुधाकर पाटील अध्यक्ष उरण सामाजिक संस्था व संतोष पवार सरचिटणीस उरण सामाजिक संस्था हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. लायन्स क्लब पनवेल यांच्या वतीने श्री.चव्हाण , श्री.गिल्डा, ॲड मनोज म्हात्रे आणि नायर नेत्र रुग्णालयाची टीम यांनी खूप मेहनत घेतली. या नेत्र चिकित्सा शिबिरात सर्वात जास्त म्हणजे जवळ जवळ ३०० लोकांच्या डोळ्यांची तपासणी झाली. त्यात रेकॉर्ड ब्रेक ६४ लोकांची मोतीबिंदू शस्त्र क्रियेसाठी पात्र ठरले. आज पर्यंत झालेल्या कॅम्प मध्ये आजचा कॅम्प हा सर्व च रेकॉर्ड ब्रेक करणारा ठरला. सरपंच सुनील तांबोळी यांनी त्यांच्या तर्फे सर्वांना मोफत चष्मा देण्याचे घोषित केले. जन कल्याण सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी राजेंद्र पाटील , मदन पाटील , अच्युत कडू , संदीप मुंबईकर, विजय पाटील, शरद पालकर यांचे योगदान विशेष महत्त्वाचे ठरले. सर्वांनी मनापासून मेहनत घेतली म्हणून हे आयोजन यशस्वी झाले. संध्याकाळ झाल्यामुळे कॅम्प थांबवण्यात आला आणि दोन दिवसांनी आदिवासी वाडी साठी पुन्हा कॅम्प चे आयोजन करण्याचे ठरले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 2 3 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे