pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कळंबुसरेत नवरात्रीत तीन पत्त्यांचा जुगार : १३ जुगाऱ्यांना अटक : दीड लाखाची रोकड जप्त

0 4 1 1 0 5
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

उरण तालुक्यातील कळंबूसरे गावात नवरात्रीत तीन पत्त्यांचा डाव मांडून जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यांवर उरण पोलिसांनी
अचानकपणे धाड टाकली.या धाडीत पोलिसांनी १३ जुगाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून एक लाख ४८ हजार ४९० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.
नवरात्रीच्या उत्सवात उरण तालुक्यातील कळंबूसरे गावात जुगाराचा डाव चालत असल्याची कुणकुण उरण पोलिसांना लागली होती.खात्रीशीर माहिती मिळताच उरण पोलिसांनी वपोनि सतीश निकम यांनी
आपले सहकारी गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कांबळे,सपोनि गणेश शिंदे यांच्या मदतीने सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अचानक धाड टाकली.या धाडीत एका अंगणात तीन पत्याचा डाव मांडून जुगार खेळणाऱ्या १३ जुगाऱ्यांना शिताफीने पकडून अटक केली.अटक करण्यात आलेल्यांमध्ये संतोष वामन राऊत, देवेंद्र महादेव पाटील, धर्मेंद्र राघव ठाकूर, संतोष चंद्रकांत गावंड, दिलिप हरी पाटील,सागर शंकर म्हात्रे, विनायक जगदीश गावंड, विश्वनाथ नामदेव पाटील,
संतोष नारायण ठाकूर, हिम्मत रामदास केणी, संजय बाबुराव गायकर, समाधान जयराम ठाकूर,दिपक विष्णू चव्हाण आदींचा समावेश आहे.त्यांच्याकडून
एक लाख ४८ हजार ४९० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 1 0 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे