pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रकाश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

उरण मध्ये एनएमएमटीची बस सेवा सुरु नागरिकांनी मानले प्रकाश पाटील व इतर पदाधिकाऱ्यांचे आभार

0 4 1 1 4 6
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27

फेब्रुवारी २०२४ पासून उरण मध्ये एनएमएमटीची सेवा बंद होती त्यामुळे नवी मुंबई मध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, आबालवृद्धाना मोठया संकटाना सामोरे जावे लागत होते.एनएमएमटी बस सेवा बंद झाल्याने खाजगी वाहना तर्फे लुटालूट चालू होती . शिवाय वेळ व श्रम अधिक खर्च होत होता . नागरिकांना कामावर तसेच कामावरून घरी पोहोचण्यास विलंब होत होता .त्यामुळे उरण शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तसेच मॉर्निंग कट्टाचे पदाधिकारी व उरणचे जेष्ठ नागरिक या सर्वांनी महानगरपालिका नवी मुंबईचे आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेउन त्यांना उरण मध्ये एनएमएमटी चालू करण्याची मागणी केली होती.एनएमएमटीची बस सेवा चालू व्हावी या संदर्भात प्रत्यक्ष भेट घेउन निवेदनही देण्यात आले.सदर निवेदनात उरणच्या ३०० नागरिकांनी सह्यांची मोहीम करून पाठिंबा दर्शविला होता.सदर निवेदन स्वीकारून प्रवाशांच्या समस्या लक्षात घेउन नवी मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त कैलास शिंदे यांनी लवकरत लवकर एनएमएमटीची बस सेवा चालू होईल असे आश्वासन उपस्थित सर्वांना दिले होते. त्यावेळी उरण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील ,अभय वेद पाठक, माजी नगरसेविका आफशा मुकारी ,अकबर नदाफ, चंदा मेवती, मोहनसिंग खरवड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले होते व या निवेदनाची दखल घेउन दिनांक २७/११/२०२४ रोजी एनएमएमटीची बस सेवा सुरु झाल्याने सर्व नागरिकांनी, प्रवाशी वर्गांनी प्रकाश पाटील व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 1 4 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे