pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

परदेशातील शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज  शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करावेत

0 4 1 2 3 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.19

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. तरी  जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती शिष्यवृती योजनेचा लाभ मिळण्यासाठी दि. 12 जुलै 2024 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात QS World University Ranking 200 च्या आत रँकींग असलेल्या विद्यापीठात पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका व पीएचडीसाठी प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांचे मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न 8 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. सदर योजनेअंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पात्र विद्यार्थ्याकडून दि. 12 जुलै 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच जाहिरातही वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच या योजनेचा तपशील, अर्जाचा नमुना व इतर आवश्यक माहिती www.maharashtra.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असेही प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 2 3 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे