चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या मातोश्री कै.पार्वतबाई डाकोरे यांना माहुर येथे भावपूर्ण श्रद्धांजली

नांदेड/प्रतिनिधी, दि 15
माहूर:– दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र ता. माहुर घ्या वतीने दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या मातोश्री जेष्ठ महिला कै.पार्वतीबाई विश्वंनाथराव डाकोरे कुंचेलीकर यांना माहूर तालुक्यातील दिव्यांग संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
श्रध्दांजलीच्या औचित्याने आयोजित शोक सभेच्या अध्यक्षस्थानी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र जिल्हा उप अध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार हे होते. प्रमुख ऊपस्थिती ता.अध्यक्ष उमेश भगत, प्रेमसिंग चव्हाण , अरविंद राठोड, हेमसिंग आडे, रेवा राठोड, राजेश सुकळकर, दादाराव कांबळे, गजानन खोकले ,विष्णू गायकवाड, अमोल सोनवणे, महिला अध्यक्ष बबीताताई मारबते ,वृद्ध महिला अध्यक्ष इंदुताई चट्टेकर, वनिताताई पेटकुले सुमनबाई हगवणे पुष्पा कलाने बालीताई जांगेवाड इत्यादी कार्यकर्ते यांनी मानाचा मुजरा करून भावपुर्ण श्रद्धांजली दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र ता.माहुर घ्या वतीने वाहण्यात आली मोठ्या संख्येने कार्यकर्ते पस्थित होते



