pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

एम.एस.जैन शाळा वाचविण्यासाठी रविवारी शांतता रॅली शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे मराठवाडा शिक्षक संघाचे आवाहन

0 4 1 2 3 8
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी, दि.29
एम.एस.जैन शाळा वाचविण्यासाठी रविवारी शांतता रॅली
शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे मराठवाडा शिक्षक संघाचे आवाहन
जालनाः शहरातील अत्यंत प्रतिष्ठित म्हणून ओळख असलेल्या श्री एम.एस.जैन ही इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय शाळेच्या संबंधित व्यवस्थापनाने घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाळा बंद करण्याबाबत शाळेच्या सूचना फलकावर पत्र डकविण्यासह पाल्यांच्या माध्यमातून पालकांनाही हे पत्र देण्यात आले आहे. तब्बल ४५ वर्ष जुनी असलेली व आज रोजीही सुस्थितीत असलेली शाळा अचानक बंद का करण्यात येत आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ही शाळा श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने चालविली जाते. शाळा वाचविण्यासाठी आता मराठवाडा शिक्षक संघाने पुढाकार घेतला असून या संघाच्या माध्यमातून शाळेचे शिक्षक, कर्मचारी व पालक, आजी-माजी विद्यार्थी हे रविवारी १ सप्टेंबर रोजी शाळा बचाओ शांतता रॅलीत सहभागी होणार आहेत.

जैन इंग्लिश स्कूलमधून गत ४५ वर्षात हजारों विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठे झाले आहेत. मात्र संस्था चालकांनी घेतलेल्या तुघलकी निर्णयामुळे अनेक माजी विद्यार्थ्यांमधूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा निर्णय चुकीचा असून शाळा सुरू रहावी, यासाठी आपणही रॅलीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाडा शिक्षक संघाने या संदर्भात निवेदन प्रसिध्द केले असून याच्या प्रतिलिपी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी, छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, सदर बाजार पोलिस निरीक्षक, धर्मादाय आयुक्त कार्यालय जालना तसेच श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघालाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनावर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, सचिव संजय येळवंते, उपाध्यक्ष जगन वाघमोडे, सहसचिव दीपक शेरे, कार्याध्यक्ष एफ.ए.सय्यद, केंद्रीय सदस्य ज्ञानोबा वरवट्टे, प्रेमदास राठोड, सदस्य पी.यु.काकड, गणेश चव्हाण, आरेफ कुरेशी, नारायण मुंडे, भगवान धनगे, हाकीम पटेल, शेख खलील, गणेश म्हेत्रे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.——————————————————————-
रविवारी १ सप्टेबर रोजी सकाळी १०:०० वाजता श्री एम.एस. जैन इंग्लिश स्कूलच्या गेटपासून सुभाष चौक, महावीर चौक, मामा चौक, वीर सावरकर चौक, सुभाष रोड, फूल बाजार, सराफा, कादराबाद, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व शेवटी गुरू गणेश भवनच्या प्रवेशद्वारा समोर या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 2 3 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे