pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज करावेत

0 4 1 2 3 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.12

 जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जावून मन:शांती तसेच अध्यात्मिक पटल गाठणे सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजन अंमलात आणली आहे.  तरी  ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी दि.31 ऑक्टोबर 2024 पर्यंत समाज कल्याण कार्यालय, जालना येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त अनंत कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

योजनेत प्रत्यक्ष प्रवास, भोजन आणि निवासी आदि सर्व बाबीचा प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार रुपये शासनाने मंजूर केला आहे.  अर्जदार महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असावा. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.   लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे. वैद्यकिय अधिकाऱ्याने पुर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारिरीकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.  याप्रमाणे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या पात्रतेचे निकष आहेत. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 2 3 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे