बुटखेडा येथे समता सैनिक दलाचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न
स्थानिकांच्या सहकार्याशिवाय च शिबिर यशस्वी?
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.6
बूटखेडा ता. जाफराबाद तालुक्यातील बुरखेडा या गावी घेण्यात आलेल्या शिबिराला खूप छान प्रतिसाद मिळाला. या शिबीरातून ३५ महिला सैनिक तयार झाल्या. यामध्ये तालुका कार्यकारणी व जिल्हा कार्यकारणी यांनी मोलाचे सहकार्य केले. तालुकाध्यक्ष बाबुराव साळवे तालुका सचिव देविदास पैठणे तालुका कोषाध्यक्ष समाधान मिसाळ तालुका संरक्षण प्रमुख प्रमोद हिवाळे तालुका संस्कार विभाग प्रमुख श्रीकिशन गायकवाड आणि इतर पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन हे शिबिर यशस्वी केले. शिक्षिका मीनाताई झीने व सहशिक्षिका बालीताई दाभाडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व ड्रिल शिकवली.
स्थानिकांच्या सहकार्याशिवाय च शिबिर यशस्वी? झाल्याचे दाखवून श्रेय वादाला भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी महत्त्व देताना दिसून येत आहे.



