सत्यशोधक विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.26
सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोषेगाव ता. भोकरदन जि. जालना येथे 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. गावामध्ये प्रभात फेरी काढून प्रजासत्ताक दिनाच्या घोषणा देत जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक आय.एस.पठाण हे होते तर कासाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उंबरे सर, गोषेगाव चे सरपंच तुळशीराम पाटील मोहिते, युवा उद्योजक आप्पासाहेब घोडे, भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले ऋषिकेश मोहिते व मयुर फुलसुंदर, अमोल मोहिते, सूरज पवार हे हजर होते. ध्वजारोहण भारतीय सैन्यदलात(CISF )नुकतेच नियुक्त झालेले शाळेचे माझी विद्यार्थी ऋषिकेश मोहिते व विशाल फुलसुंदर यांच्या हस्ते करण्यात आले. तर शिक्षक श्री विजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईड मार्फत पथसंचलन करण्यात आले व ध्वजास मानवंदना देण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे इंग्रजी,मराठी, हिंदी तून करत प्रकाश टाकला, शिक्षक श्री निलेश कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धर्म समभाव हा मुकअभिनय 10 वी तील विद्यार्थ्यांनी सादर केला. पर्यवेक्षक आय.एस.पठाण यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेच्या सत्तेचे राज्य म्हणजेच प्रजासत्ताक होय. तसेच आपले हक्क व कर्तव्य कोणती याबद्दल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी आदिती कड या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन ऋतुजा जाधव या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रम संपन्न होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुनीलजी वाकेकर संस्थेच्या सचिव जयश्रीताई बनकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी,पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



