नळविहीरा जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही संच भेट.
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.13
मुंबई येथील चंद्रकांत सुखदेव खरात यांच्या वतीने शाळेचे शिक्षक विनोद कळंबे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या दिवंगत आजी स्व.सरूबाई दौलत गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नळविहीरा शाळेला 43 इंची स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही संच भेट म्हणून देण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर गाडेकर होते तर यावेळी सरपंच सोपानराव जंजाळ, चंद्रकांत खरात, एल. आय.सी. चे अंकुश आढावे,शंकर धनवई,अंकुश गाडेकर,सुनील गायकवाड, प्रल्हाद गाडेकर, सुनील मोरे, अमोल मोरे, वसंता गाडेकर,देवराव कोल्हे, नंदू गाडेकर,विलास गाडेकर, परमेश्वर मोरे मनोहर जंजाळ, परसराम गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना सुनिल गायकवाड म्हणाले की दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध होत असल्याने याचा निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर गाडेकर म्हणाले की स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थी अधिक प्रभावीपणे शिकतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचलन विनोद कळंबे यांनी केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक शिवहरी नागरे, काशिनाथ उखर्डे, ज्ञानेश्वर झगरे, मंजुषा बकतकार,पूजा गहेरवाल यांनी परिश्रम घेतले.



