‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना; ई-केवायसीसाठी पोर्टल पुन्हा सुरू

जालना/प्रतिनिधी,दि.11
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतील ज्या लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्या आहेत, अशा महिलांसाठी सुधारणा करण्याची संधी दि.31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जातील त्रुटीची सुधारणा करुन या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांनी कुटुंबातील सदस्यांच्या नोकरीविषयक माहितीमध्ये नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला आहे. विशेषतः कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा स्थानिक संस्थेत नियमित/कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत किंवा कसे? तसेच कुटुंबातील सदस्य सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत किंवा कसे? या पर्यायांची निवड करताना झालेल्या चुकांमुळे पात्र महिलांना लाभ मिळण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत.



