निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश
सौ संध्या संजय देठे नगरसेविका जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा जालना यांनी केले न्यायालयाचे अभिनंदन!
जालना/प्रतिनिधी, दि.6
निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लवकर घेण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितच लढेल अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्री, राज्यमंत्री उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत दिलेल्या निकालावर विचारले. यावर फडणवीस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुत एकत्रित असेल. स्थानिक पातळीवर एखाद्या ठिकाणी वेगळा निर्णय होऊ शकतो पण एकूणच या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार आहे.
कित्येक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबणीवर होत्या आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांना समाजकारणाची नव दिशा देण्यासाठी एक नवी उमेद मिळाली आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे सौ संध्या संजय देठे यांनी अभिनंदन केले आहे



