pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

केंद्रीय पथकाद्वारे दुष्काळी स्थितीची पाहणी

0 4 1 0 3 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.13

केंद्रीय आंतर मंत्रालयीन समितीच्या पथकाने आज जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केली. या पथकात केंद्रीय कापूस विकास अधिकारी डॉ. ए.एल. वाघमारे व मुल्यमापन व संनियंत्रण अधिकारी हरिष हुंबर्जे यांचा समावेश होता. या पथकाने आज भोकरदन तालुक्यातील जुई धरण, पंढरपूरवाडी, हसनाबाद, फुलेनगर, पिंपरी या गावालगत असणाऱ्या शेतातील पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करुन पिक परिस्थिती व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

या पाहणी दरम्यान पथकासमवेत अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्री. कांबळे, तहसिलदार संतोष बनकर आदींसह कृषी व महसूल विभागाचे स्थानिक कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 3 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे