pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्ह्यात विविध तांत्रिक उद्योजकता विकास  प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

0 4 1 0 4 3
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 7 

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र, जालना पुरस्कृत विशेष घटक प्रवर्गातील युवक-युवतींकरिता सन 2024-25  अंतर्गत मोफत विविध तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेवून स्वतःचा स्वंयरोजगार उभारावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर आणि विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केले आहे.

जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणात जालना येथे ब्युटी पार्लर, बदनापूर येथे बेसिक अकाऊटींग, जाफ्राबाद येथे गारमेंट तयार करणे आणि अंबड येथे बेसिक कॉम्प्युटर प्रशिक्षण तर परतूर येथे फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे लाभार्थींनी वळून स्वतःचा स्वंयरोजगार निर्माण करावा हा या कार्यक्रम आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. प्रात्याक्षिकद्वारे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

उद्योजकता विकास प्रशिक्षणात उद्योजकीय गुणसंपदा, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकासासाठी सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ, पाहणीतंत्र व तंत्र विपणन व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, कर्ज योजना व कर्ज प्रकरणे व्यवस्थापन व विक्री कौशल्य लघु उद्योग विषयक कायदे, शासकीय धोरणे, अकाउंटस, लघु उद्योजकाचे व्यवस्थापन, बँकेचे व्यवहार इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. प्रशिक्षण कार्यक्रम हा संपूर्णत: मोफत असून यासाठी लाभार्थी किमान सातवी पास आणि वय वर्षे 18-45 दरम्यान असलेल्या पात्रता धारक इच्छुक लाभार्थींना प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी फोन.नं.02482-220592 येथे संपर्क साधावा. असे प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ,जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 4 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे