pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रत्येक तालुक्यातून दोन शिक्षकांना आदर्श पुरस्कार द्या -प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

0 4 1 0 5 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.9

जालना जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी प्रत्येक तालुक्यातून एक प्राथमिक आणि एक माध्यमिक शिक्षक यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी केली जाते मात्र यावर्षी अशा पद्धतीने निवड न करता फक्त जिल्ह्यातून तीन शिक्षकांना आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आला असून असे न करता वंचित राहिलेल्या तालुक्यातील शिक्षकांना देखील आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.याविषयी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दरवर्षी जिल्ह्यातील १७ शिक्षकांना आदर्श पुरस्कार देण्यात येतो मात्र यावेळी फक्त ३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने जिल्ह्यातील ५तालुके आणि १४ शिक्षक या पुरस्कारापासून वंचित आहेत. याशिवाय प्राथमिक शिक्षकांमधून पात्र असलेल्यांना विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर या पदावर पदोन्नती देण्यात यावी, आगाऊ वेतनवाढी फरक देयके, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके आणि अन्य देयकांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा मागण्या निवेदनातून करण्यात आलेले आहेत. निवेदनावर प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव भालके, सरचिटणीस शांतीलाल गोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 5 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे