pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पापळ शिवारात बिबट्या अनेकांना झाले दर्शन : भीतीचे वातावरण

0 4 1 0 4 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 6

पापळ शिवारात वासराचा फरशा पडल्यानंतर गेलेल्या बिबट्याच्या पावलांचे ठसे.

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील पापळ शिवारात बिबट्या बिबट्याचा आठवडाभरापासून वावर असून अनेक शेतकऱ्यांना बिबट्या नजरेस पडला आहे दरम्यान वनीकरण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सद्यस्थितीत शेती कमांनी वेग घेतला आहे विविध शेती कामे शेतकऱ्यांना करावयास लागत असतानाच पापळ वरखेडा शिवारात ठिकठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. येथील माळराणालगत असलेल्या कुमकर वस्तीवरील शेतकऱ्यांना दोन दिवसापूर्वी बिबट्याचे दर्शन झाले तर पापळ शिवारातील ईराळे वस्तीवर बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांनी रात्र जागून काढले. दरम्यान शुक्रवारी रात्री अंकुश बोबडे यांनाही बिबट्याने दर्शन दिले.
आठवडाभरापासून परिसरात बिबट्या बिनभोगाट फिरत असताना वनीकरण विभागांच्या अधिकाऱ्याकडून मात्र याबाबत कुठलीही कार्यवाही केली जात नाही.
मागील आठवड्यात पापळ शिवारात
वासराचा फडशा पाडल्याची घटना सोमवारी रात्री घडली. शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली त्या अनुषंगाने वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी योगेश डोमळे, सहाय्यक वनाधिकारी हटकर यांनी परिसराची पाहणी केली. या ठिकाणी बिबट्या सदृश्य प्राण्यांचे पायाचे ठसे असू शकतात असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात बिबट्या फिरत असल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने कार्यवाही करणे आवश्यक आहे
मागील आठवड्यातही ग्रामस्थांना अकोला देव काळेगाव खानापूर शिवारात बिबट्याचे दर्शन झाले होते खानापूर परिसरातील नागरिकांनी दिवाळीमध्ये रात्र जागून काढली होती दरम्यान बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शेती कामे करताना अडचणी
शेतामध्ये सद्यस्थितीत रब्बी लागवडीसाठी शेती तयार करण्याची लगबग आहे याशिवाय कापूस वेचणीसाठी ह महिला मजूर शेतात जातात
परंतु बिबट्या ठिकठिकाणी दिसत असल्याने मजुरांकडून शेतात काम करणे टाळले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून वनविभागाने तातडीने याबाबत कार्यवाही करणे गरजेचे आहे असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

बिबट्या एका ठिकाणी राहत नसतो सतत फिरस्तीवर असतो यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता काळजीने शेतात कामे करावी. बिबट्या आढळून आल्यास पातळीने वन विभागाशी संपर्क करावा.
– योगेश डोमळे , वनपरिमंडळ अधिकारी भोकरदन

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 4 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे