जालना तालुक्यातील तांदुळवाडी (खु) येथील स्वस्त धान्य दुकानदार ग्रामस्थांची अरेरावी करून शासनाकडून देण्यात येणारे मोफत धान्य वाटप करत नसून व्यक्तीनुसार धान्य पावती देत नसल्याने या दुकानाची तात्काळ चौकशी करून सदरचे दुकान तात्काळ निलंबीत करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, शिधापत्रिकाधारक महिला आणि समस्त ग्रामस्थांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे तांदुळवाडी (खु) ता. जि. जालना येथील स्वस्त धान्य दुकानदार अन्नासाहेब रामभाऊ चितेकर हे स्वस्त धान्य शिधापत्रिका धारकांना अरेरावीची भाषा वापरून मोफत धान्यापासुन वंचित ठेवत आहेत व आता पर्यंत एकही वेळ मोफत धान्य न देता लाभार्थ्यांकडून सर्रासपणे धान्याचे पैसे घेतात. सनासुदीच्या निमित्ताने मिळणारा आनंदाचा शिधा 100 रुपयाच्या ऐवजी 250 ते 300 रु. घेतले जातात. धान्याचे वितरण हे नियमानुसार सक्षम कुटूंबाला जास्त धान्य यामध्ये तांदुळ व गहु 50 किलो, 25 किलो प्रमाणे अनोळखी लोकांना व गावातील लोकांना जास्तीचे पैसे घेवून दिले जाते. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी प्रत्येक महिण्याला गहु, तांदुळ, वितरण केल्या नंतर पावती मागीतल्यास देत नाहीत. उलट अरेरावीची भाषा वापरतात या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधीत दुकानदारावर निलंबनाची कारवाई करावी नसता सरपंच, ग्रा. पं. सदस्य, शिधापत्रिका धारक महिला आणि ग्रामस्थांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर सरपंच सुनिता शिवाजी कापसे, सदस्य दिलीप खरात, संघप्रिया शिंदे, शिवकन्या हेलगे, सुधाकर कापसे, बिबिशन कापसे, कडुबा निकाळजे, बबनराव बोर्डे, तेजराव शिंदे, भरत कापसे, संदीप निकाळजे, विश्वजित कापसे, योगेश बनकर, प्रविन खरात, अजय खरात आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या आहेत.