pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मंगळसूत्र चोरट्याला ग्रामीण पोलिसांनी 12 तासात पकडले

0 4 1 0 4 6
[sp_wpcarousel id="1375"]

मोर्शी ता./प्रतिनिधि,दि.14

 

चांदूर रेल्वे व मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळसूत्र चोरीच्या दोन घटना नुकत्याच घडल्या होत्या. या दोन्ही प्रकरणात एलसीबीसह चांदूर रेल्वे पोलिसांच्या पथकाने एका ५५ वर्षीय मंगळसूत्र चोरट्याला अवघ्या १२ तासांत अटक केली.जितेंद्र माणिकराव जावरे (५५, रा. छांगानी नगर, अमरावती) असे मंगळसूत्र चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण ७८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ११ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता चांदूर रेल्वे येथील लिनाबाई पाचकवरे (६५) या आपल्या मुलीसह जात असताना दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील १२ हजार रुपयांचे सोन्याचे मणी हिसकावून पळ काढला. या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. याआधीही अशाच प्रकारची घटना मोर्शी येथे जून महिन्यात घडली होती. दरम्यान घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि चांदूर रेल्वे पोलिस तपास करत असताना गुप्त माहितीच्या आधारे जितेंद्र जावरे याला छांगानी नगर येथील घरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून दुचाकीसह अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला.जितेंद्र जावरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अमरावती ग्रामीण/शहर तसेच यवतमाळ जिल्ह्यात एकूण १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पीएसआय मूलचंद भांबुरकर, विना पंडे, नंदलाल लिगोट या अधिकाऱ्यांच्या पथकाने केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 4 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे