pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संजीवनी इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा

0 4 1 0 3 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशालदेशमुख,दि.26

टेंभुर्णी ता जाफराबाद येथील संजीवनी इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. दत्ता देशमुख सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार शेख अशपाक सर श्री गंगाराम धनवई,श्री चंद्रकांत उखर्डे, श्री दीपक उखर्डे ,श्री विकास देशमुख,श्री दीपक वाघ,श्री दीपक उखर्डे,श्री सचिन वाघ , उमर शेख,श्री अरुण इंगळे,गोपाल इंगळे, श्री रघुनाथ इंगळे सावित्रीबाई उखर्डे अश्विनी उखर्डे , सौ स्वाती उखर्डे, निर्मलाबाई निंबाळकर ,सौ मनीषा बकाल, सुनिता देशमुख यांची उपस्थिती होती. प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ध्वजपूजन श्री ज्ञानेश्वर धनवई व सौ रेखा धनवई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रा दत्ता देशमुख सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले यामध्ये प्रथमेश उखर्डे ,समृद्धी बकाल,ऋतुजा उखर्डे ,तेजल देशमुख ,प्रज्वल उखर्डे, मरियम शेख यांचा समावेश होता. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट सादरीकरण बद्दल विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आले. प्रा दत्ता देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना 500 रुपये खाऊ घेण्यासाठी बक्षीस स्वरूपामध्ये दिले तर गंगाराम धनवई यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट खाऊ म्हणून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीला जाधव मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे प्राचार्य सतीश जाधव सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाग्यश्री जाधव मॅडम, वैशाली पंडित मॅडम ,हिना शेख मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 3 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे