फेंटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने दि.4 ते 6 जानेवारी 2024 दरम्यान होणार्या दुसर्या सब ज्युनियर, ज्युनिअर व सीनियर तसेच पहिल्या मिनी सब ज्युनिअर राज्यस्तरीय फेंटबॉल अजिंक्यपद स्पर्धेकरिता जालना जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी दि. 23 डिसेंबर 2023, शनिवार रोजी संध्याकाळी जिल्हा क्रीडा संकुल मैदान येथे संध्या 5 वाजता निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर निवड चाचणीतून मिनी सब ज्युनिअर, सब ज्युनिअर, ज्युनिअर व सीनियर या प्रत्येक गटासाठी आठ मुले व आठ मुली यांची निवड करण्यात येईल. निवड झालेले खेळाडू जालना येथे संपन्न होणार्या राज्यस्तरीय फेंटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करतील.
निवड चाचणीत सहभागी होणार्या खेळाडूंची जन्मतारीख मिनी सब ज्युनिअर गटासाठी 1 जुलै 2010 किंवा त्यानंतरची, सब ज्युनिअर गटासाठी 1 जुलै 2007 किंवा त्यानंतरची, ज्युनियर गटासाठी 1 जुलै 2004 किंवा त्यानंतरची असावी व सीनियर गटासाठी वयाची कोणतीही अट नाही.
निवड चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी जालना जिल्हा असोसिएशन सचिव संतोष वाघ मो. नं. 9021420586 किंवा गोवर्धन वाहूळे, श्रीमती किरण पाटील, शेख समीर, सोहेल खान, नितीन जाधव, वेदांत सोरटी यांच्याशी संपर्क साधावा.
तरी सदर निवड चाचणी मध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आव्हान राज्य संघटनेचे अध्यक्ष खुशाल सिंग राणा ठाकूर, कार्याध्यक्ष अक्षय भैय्या पवार, समन्वय समीती प्रमुख बबन दादा सोरटी, संस्थापक तथा राज्यसचिव शेख चाँद पी.जे., निरीक्षक शेख अहमद, तांत्रिक समिती प्रमुख प्रा. डॉ. हेमंत वर्मा, पंच प्रमुख सचिन आर्य, राज्य कोषाध्यक्ष विजय गाडेकर, राजकुमार दांडगे, राज्य प्रशिक्षक प्रमुख उमेशचंद्र खंदारकर, अॅड. अमजत पठाण, प्रा. गायत्री सोरटी, श्रीमती वैशाली सरदार, सोपान शिंदे, तुषार गर्जे, सुभाष पारे, श्रीमती सुनिता गवई, राजेभाऊ मगर, मो. मारूफ खान, सुरेश सावंत, अमोल सातपुते, नरेश शिंदे आदींनी केले आहे.