pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

डीपीसीची कामे पाणी संकटाचा खासदार आमदारांकडून आढावा

0 4 1 0 5 0
[sp_wpcarousel id="1375"]

मोर्शी/प्रतिनिधि,दि.1

मोर्शी : मोर्शी तालुक्यातील लाडकी, येरला येथील पाण्याची शिकस्त टाकी दुरुस्तीची सूचना
मोर्शी आणि चांदूर रेल्वे शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश देण्यासोबतच राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे तसेच आ. प्रवीण तायडे आणि राजेश वानखडे यांनी मंगळवारी जिल्हा कचेरीत महसूल तसेच इतर विभागाच्या कामांचा आढावा घेतला.बैठकीला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जि. प. सीईओ संजीता महापात्र, अपर जिल्हाधिकारी विवेक जाधव, आरडीसी अनिल भटकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रीती देशमुख, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक महेश शिंदे आदी विभागप्रमुख उपस्थित होते.खा. डॉ. बोंडे यांनी मोर्शी, वरुड, शेंदुरजनाघाट परिसरातील नागरिकांकडे पीआर कार्ड नसल्यामुळे घरकुलाचा लाभ येथील लाभार्थ्यांना मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रलंबित पीआर कार्ड प्रकरणांचा निपटारा करून नागरिकांना कार्ड मिळवून द्यावे, असेही या बैठकीत ठरवण्यात आले. मोर्शी तालुक्यातील लाडकी, येरला येथील पाण्याची टाकी शिकस्त झाली आहे. नवीन बांधण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, तसेच वीज बील थकीत असल्यामुळे अडचणीत आलेला मोर्शी व चांदूर रेल्वे शहरातील पाणी पुरवठा तातडीने पूर्ववत करावा, असे निर्देशही खा. डॉ. बोंडे यांनी दिले. वरुड नगर परिषद हद्दीतील आठवडी बाजार भरत असलेल्या जागेवरील आरक्षण रद्द करून लाभार्थ्यांना पट्टे वाटप करावे. शिवाय वरुड तालुक्यातील एकलविहीर ते लिंगा रस्त्यासाठी अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना त्वरित मिळवून द्यावा, असेही या वेळी ठरवण्यात आले. स्केटिंग खेळाचा प्रसार होण्यासाठी मोर्शी शहरातील क्रीडा संकुलाच्या किंवा नगर परिषदेच्या खुल्या जागेवर २० हजार चौरस फूट जागेवर रोलर स्केटिंग रिंग तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत कार्यवाही करावी, असेही या वेळी ठरवण्यात आले.पर्यटनाला चालना, स्केटिंग रिंग देणार पर्यटनाचा विकास झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. नांदुरा येथील ‘जय जवान जय किसान निसर्ग पर्यटन केंद्रा’ला चालना देण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी. तसेच मेळघाटातील आमनेरी किल्ला स्थळ पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या संदर्भातही आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 5 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे