विद्यार्थ्यांच्या आवाजाने गजबजला शाळेचा बालबाजार; 25 हजार रुपयांची झाली उलाढाल

जालना/प्रतिनिधी,दि.28
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पानेवाडी तालुका घनसावंगी येथे मंगळवार दिनांक. 28.01.2025 रोजी बालबाजार (आनंदनगरीचे) आयोजन करण्यात आले होते. मुलांचे व्यावहारिक ज्ञान वाढवण्यासाठी तसेच शिक्षणाबरोबरच आर्थिक व्यवहाराचे ज्ञान प्रत्यक्ष कृतीतून मिळावे त्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्साहात शेतीमधील भाजीपाला व स्वतः बनवलेले पदार्थ,वस्तू यांचे स्टॉल लावून त्यांची विक्री केली.सदर बालबाजारात इयत्ता- पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विविध प्रकारच्या 20 ते 25 प्रकारच्या साहित्यांचे/ पदार्थांचे स्टॉल मांडून जवळपास 25 हजार रुपयांची उलाढाल केली. यामधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष खरेदी- विक्रीचा अनुभव घेता आला बालबाजारात सर्व प्रकारचा भाजीपाला, विविध फळे, समोसे, कचोरी,चहा, पाणीपुरी,धपाटे, गुलाबजामुन, शैक्षणिक साहित्य, खमंग पापड, चना उसळ, पोहे अशा अनेक प्रकारचे स्टॉल मांडून उत्तम प्रकारे वस्तूंची विक्री केली. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांना हिशोब करताना गणितीय आकडेमोड करून पैशांचे व्यवस्थापन करता येत होते ..बाजारात आपल्या वस्तू विकण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करत असताना ताजी भाजी, कोवळी भाजी गरम भजी, खमंग पापड,गोड पेरू घ्या, घ्या काका, घ्या दादा, घ्या मामा ,घ्या मावशी, अशा प्रकारच्या आवाजाने शालेय परिसर अक्षरशः दणाणून गेला होता..शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षण प्रेमी,पालक तसेच गावातील नागरिक यांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. त्यांनी वस्तू व पदार्थ खरेदी करून विद्यार्थ्यांचा उत्साह व आनंद आणखी वाढवला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक नाविन्यपूर्ण अनुभव अनुभवण्यास मिळाला होता.. सदर आनंदनगरीच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अंभोरे , शिक्षक प्रदिप मेहेत्रे , दिपक लोदवाल , सदाशिव वाघ , शरद ताठे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन व परिश्रम करून बालबाजार (आनंदनगरी) चे यशस्वी आयोजन केले.