pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची उरण विधानसभा मतदारसंघातील विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती

0 1 7 2 4 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8

रविवार दिनांक 07 मे 2023 रोजी शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख तथा आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील विविध आशा सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित लावली.यामध्ये नवीन शेवा, आवरे, उरण कोटनाका, कराडे, बद्रुके, अंबिवली, नदाल, कोण, अष्टे, कासमभाट, सारडे गावातील साखरपुडा,हळदी समारंभ, लग्न समारंभ व सत्यनारायणाची महापूजा अशा विविध कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद दिला. यावेळी आयोजकांनी जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी वधूवरांचे आई-वडील, नातेवाईक, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 2 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे