राजमाता आहील्यादेवी होळकर जयंती निम्मित 31 मे ला चोंडी येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहा – दत्ता काळे,नितिन भोंडवे
पाटोदा/प्रतिनिधी, दि.15
जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव साजरा होणार आहे. शासनाने या महोत्सवासाठी विशेष निधीची तरतूद केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या येत्या 31 मे रोजी होणाऱ्या 299 व्या जयंती महोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चौंडी येथे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते प्राध्यापक आमदार राम शिंदे साहेब यांनी शुक्रवारी दिली. या जयंती महोत्सवासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व होळकर घराण्याचे वंशज युवराज तिसरे यशवंतराव होळकर यांना विशेष निमंत्रित केले आहे. तरी सर्व समाज बांधवांनी सामूहिक जयंती महोत्सवासाठी उपस्थित राहावे 31 मे रोजी राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासकिय सुट्टी जाहीर करावी.त्यांनी केलेल्या कार्याचा,त्यागाचा,त्यांचे विचार आत्मसात करून सन्मान करावा.दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही जयंती उत्सव मोठ्या संख्येने साजरी करावी असे आवाहन मा. नितिन भोंडवे व मा.दत्ता काळे यांनी केले आहे.



